बंद

    कार्यक्रम

    पदोन्नती सत्कार समारंभ
    मुंबई वाहतूक पोलीस दलातील 14 पोलीस हवालदार यांना सहायक पोलीस निरीक्षक पदी व 13 पोलीस शिपाई व पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती ही केवळ पगार वाढ नसून त्यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांची कर्तव्य प्रती असलेली निष्ठा व वर्षानुवर्षाची मेहनत दडलेली असते त्यामुळे पदोन्नती देणे हा फक्त प्रशासकीय सोपस्कार न राहता तो पदोन्नती होत असलेल्या अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत व्हावा या उद्देशाने माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आदेशाने वाहतूक पोलीस दलातील 17 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा त्यांच्या कुटुंबीयांसह माननीय अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक मुंबई, श्रीमती प्रियंका नारनवरे यांच्या हस्ते पदोन्नती सत्कार समारंभ आयोजित करून सन्मान करण्यात आला. नमूद कार्यक्रमाच्या वेळेस श्री समाधान पवार, पोलीस उपायुक्त, मध्य व मुख्यालय वाहतूक मुंबई व श्री प्रदीप चव्हाण. पोलीस उपायुक्त , पूर्व उपनगरे वाहतूक मुंबई हे देखील उपस्थित होते.

    photo-collage.png

     

    रस्ता सुरक्षा सप्ताह-२०२४
    दि. ११-१-२०२४ रोजी वाहतूक नियंत्रण शाखा, मुंबई पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह-२०२४ अंतर्गत रस्ता सुरक्षा दल संचलन समारंभ नायगाव पोलीस परेड मैदान, नायगांव, दादर (प) येथे संपन्न झाला. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर यांच्या शुभ हस्ते ‘रस्ता सुरक्षा दल’ संचलन २०२४ मानवंदना व विजेत्यांचा बक्षिस समारंभ पार पडला.

    New Microsoft PowerPoint Presentation

    रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त वाहतुकीच्या विविध नियमांचे पालन करणे आणि नागरिकांमध्ये त्याबद्दलची जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबईतील विविध ट्रॅफिक चौकीतील पोलीसांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

    33ff36b7-0f08-4898-b041-8b0b5f7ae3e1


     

    नियमांचे पालन केल्याबद्दल प्रशंसा

    मोटरसायकलस्वार व मागे बसणारा (पिलियन रायडर) या दोघांनी शिरस्त्राण (हेल्मेट) व्यवस्थित घातल्याचे दिसले असता, वाहतूक विभागाकडुन कौतुकाचे प्रतीक म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
    4pic