Close

    Police Officers

    पो.शि.प्रविण क्षीरसागर

    पोलिसांमुळे दाम्पत्याला जीवदान

    मुंबईच्या अंधेरी परिसरात फ्लायओव्हर उतरताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने दोन गटांगळ्या घेतल्या. शनिवारी घडलेल्या या अपघातामध्ये एक दाम्पत्य सुदैवाने वाचले ते फक्त आणि फक्त सीटबेल्टमुळे आणि पोलिसांमुळे. अपघाताआधी पंधरा मिनिटे आधी वाहतूक पोलिसांनी या दाम्पत्याची कार अडवून सीटबेल्ट लावण्यास भाग पाडले होते. अपघातातून बचावताच ‘देवदूत’ माणत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांचे आभार मानले. बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातून शनिवारी गौतम रोहरा आणि त्यांची पत्नी अंधेरीच्या दिशेने कारमधून चालले होते. मुसळधार पाऊस पडत होता. अशातच रस्त्यावर उभ्या असलेल्या कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांनी गौतम यांची कार थांबवली. ‘तुमच्या बायकोने सीटबेल्ट लावलेला नाही’ एक हजार रुपये दंड आहे. दंड महत्वाचा नाही अपघात घडला तर जीवावर बेतेल.’ असे म्हणत क्षीरसागर यांनी त्यांना सीटबेल्ट लावण्यास भाग पाडले. पुढच्या पंधरा मिनिटांत गौतम यांची कार अंधेरीच्या फ्लायओव्हर वर पोहोचली आणि त्यांचे नियंत्रण सुटले. पूल उतरत असताना अपघात झाला आणि कारने दोनदा पलटी खाल्ली. यामध्ये कारचे बरेच नुकसान झाले मात्र गौतम आणि त्यांच्या पत्नीला सीटबेल्ट लावल्याने किरकोळ दुखापत झाली. पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांनी सीटबेल्ट लावायला भाग पाडले नसते तर जीव गेला असता याची जाणीव गौतम आणि त्यांच्या पत्नीला झाली. त्यांनी वांद्रे कुलां कॉम्प्लेक्स येथील वाहतूक पोलिसांची चौकी गाठत क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. हा सर्व प्रसंग त्यांनी समाजमाध्यमांवरून शेअर केल्याने मुंबई पोलिसांची वाहवा होत आहे.

     

    laptop

    प्रवासी महिलेचा हरवलेला लॅपटॉप मिळवून दिला.

    दिनांक 05/10/2024 रोजी MH04HZ1251 या ऑटो रिक्षा मध्ये एक प्रवासी महिला स्वतःचा लॅपटॉप विसरली होती. सदर ऑटो चालकाने सदरचा लॅपटॉप डी.एन. नगर वाहतूक विभागात आणून दिल्याने सदर प्रवासी अनोळखी असल्याने ओळख पटत नव्हते तरी सदर ऑटो चालकास पेमेन्ट हे गुगल पे ने केल्याने गुगल पे वरुन पो. शि.०९०३०१/ विजेंद्र नाईक व पो शि ०९०५२३/अनिरुद्ध साळुंखे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षक श्री गणेश अंधे यांचे मार्गदर्शनाने लॅपटॉप विसरलेले प्रवासी श्रीमती हर्षदा राठोड. रा. बोरिवली यांचा मोबाईल नंबर प्राप्त करून सदर प्रवासी यांना डी.एन. नगर वाहतूक चौकीत बोलावून पडताळणी करून त्यांचे विसरलेले 50000 रु. रकमेचा लॅपटॉप तात्काळ मिळवून दिले.

     

    water

    समुद्रात बुडनाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी समुद्रात मारली उडी.

    मुंबईच्या बी.डी. सोमाणी जंक्शन येथे एका महिलेला समुद्रात बुडताना पाहून मुंबई वाहतूक पोलीस दलातील हवालदार भिकाजी गोसावी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली. कफ परेड येथील सोमाणी जंक्शन येथे भिकाजी कर्तव्यावर असताना एका अज्ञात महिलेने पाण्यात उडी मारल्याचे त्यांनी पाहिले. भिकाजी यांनी वेळ न घालवता ताबडतोब नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. संबंधित महिलेला पाण्याबाहेर काढल्यानंतर भिकाजी यांनी तिला सीपीआर दिला. त्यानंतर या महिलेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.