दृष्टी आणि ध्येय
सुरक्षा अंगीकार करणे ……. जीवन मौल्यवान आहे!
मुंबई वाहतूक पोलीस अहोरात्र पूर्ण क्षमतेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून, व्यापक दृष्टिकोनातून व संपूर्ण समर्पण भावनेने तसेच पारंपारिक पद्धतीला बाजूला करून मुंबईतील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी निरंतर प्रयत्नशिल आहे.
वाहतूक विभागामध्ये आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दैनंदिन कामकाजामध्ये अनावश्यक मानवी हस्तक्षेप कमी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पारदर्शकरीत्या व गतिमान कायदेशीर कारवाई करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिस्त लावण्यासाठी एक मध्यवर्ती प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. यामुळे वाहन चालक त्यांची ‘चलता है….. !’ ही मनोवृत्ती सोडतील व वाहतूक नियमांचे पालन करून शिस्तीने वाहन चालवतील ही अपेक्षा आहे.
‘परिवर्तन ही एकच स्थिर बाब आहे’ हे सर्वज्ञ आहे. याकरिता आम्हास अधिक चांगल्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि अंमलबजावणीसाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.