बंद

    उपक्रम

    वाहतूक व्यवस्थापनासाठी सी.सी.टी.व्ही. (बंदीस्त मंडलयुक्त दुरचित्र) याची अंमलबजावणी

    वाहतूक व्यवस्थापनासाठी सी.सी.टी.व्ही. (बंदीस्त मंडलयुक्त दुरचित्र) याची अंमलबजावणी

    वाहतूक व्यवस्थापनासाठी सी.सी.टी.व्ही. (बंदीस्त मंडलयुक्त दुरचित्र) याची अंमलबजावणी

    मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी ‘सीटी सर्विलन्स प्रोजेक्ट’ अंतर्गत तसेच सार्वजनिक व खाजगी संस्थामार्फत बसविण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेरा यांमार्फत निगराणी ठेवण्यास मदत होत आहे. सी.सी.टी.व्ही.च्या वापरामुळे वाहतूक पोलीसांचा प्रतिसाद, दृश्यमानता व वाहतूक व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेमधे सकारात्मक वाढ झालेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था संदर्भात प्राप्त झालेली संशयीत घटनेबाबतची महत्वाची माहिती संबंधित विभागांना पुरविण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरत आहे.

     

     

     

     

     

    स्वयंचलित वाहतूक नियंत्रण सिग्नल यंत्रणा

    स्वयंचलित वाहतूक नियंत्रण सिग्नल यंत्रणा

    स्वयंचलित वाहतूक नियंत्रण सिग्नल यंत्रणा

    वाहतुकीचे नियमन सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी मध्यवर्ती सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. रस्त्यावरील वाहतूक हाताळण्याची क्षमता वाढविणे, अपघात कमी करणे, प्रवासाचा वेळ कमी करणे, पादचाऱ्यांना प्राधान्य देणे, अनावश्यक वाहतूक कोंडी टाळणे, वाहनांचे इंधन व झीज वाचविणे, प्रदूषण कमी करणे, त्याचबरोबर वाहतूक कोंडी मुळे होणारी वाहन चालकांची वैफल्यग्रस्तता व राग कमी करण्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा प्रभावीपणे उपयुक्त ठरलेली आहे.

     

     

     

     

    आधुनिक हायड्रॉलिक आणि हिप्पो कर्षित वाहने

    आधुनिक हायड्रॉलिक आणि हिप्पो कर्षित वाहने

    आधुनिक हायड्रॉलिक आणि हिप्पो कर्षित वाहने

    वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने (महागडी वाहने सुद्धा), अवजड वाहने व बेकायदेशीरपणे रस्त्यावर लावलेल्या वाहनांना उचलून व कर्षित करून नेवून कारवाई करण्यासाठी हि अत्याधुनिक कर्षित वाहने खुप उपयोगी ठरत आहेत.

     

     

     

     

     

    प्रबोधन आणि शैक्षणिक उपक्रम

    प्रबोधन आणि शैक्षणिक उपक्रम

    प्रबोधन आणि शैक्षणिक उपक्रम

    शाळेमध्ये वाहतूक विषयक माहिती देण्यासाठी रोड सेफ्टी पेट्रोल (आर.एस.पी.) प्रशिक्षणांतर्गत विविध मनोरंजक पद्धती व आभासी खेळ यांचा उपयोग करून नव्या पिढीमध्ये आवड निर्माण केली जाते. अपघाताच्या मानसिक धक्यामधून सावरण्यासाठी वैयक्तिक समुपदेशन करण्यात येते. वाहन चालकांना प्रगत प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे औपचारीक प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर वाहन चालकांना प्रत्यक्ष रस्त्यावर वाहन चालविण्याच्या अनुषंगाने संगणकीय प्राकृतिद्वारे वाहन चालवणे व रस्तासुरक्षा मानकांचा सराव दिला जातो.

     

     

     

     

    थेट दृकश्राव्य संवाद

    थेट दृकश्राव्य संवाद

    थेट दृकश्राव्य संवाद

    द्विदिशामार्गक दृकश्राव्य संप्रेषण प्रणालीमुळे वाहतूक पोलिसांना वास्तविक खरी माहिती मिळण्यास व कर्तव्य उत्पादक्षमता वाढविण्यास मदत झालेली आहे. तसेच प्रवाशांच्या वेळेची बचत करून त्यांना इच्छितस्थळी सुरळीत पोहचविण्यासाठी विविध योजनांची आखणी करण्यास व दैनंदिन कर्तव्य पुर्ण क्षमतेने करण्यास उपयुक्त ठरलेली आहे.

     

     

     

     

     

    स्मार्ट मोबाईल अँप्स

    स्मार्ट मोबाईल अँप्स

    स्मार्ट मोबाईल अँप्स

    मुंबई वाहतूक विभाग हे अखिल भारतात अग्रगण्य व आधुनिक असल्याने ,आम्ही तयार केलेले मोबाईल अँप्स हे मुंबई वाहतूक पोलिस तसेच नागरिकांसाठीसुद्धा उपयुक्त आहेत. एमटीपी कर्तव्य मोबाईल अँपमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती सादर करण्यास मदत होऊन त्यांचे वर्तमान स्थानासह उपस्थिती नोंदवण्यास फायदा होईल. तसेच यामुळे विविध अहवाल तयार करण्यास आणि अमंलदाराची नियुक्ती किंवा आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यासाठी आणि निर्णय प्रक्रिया जलद करण्यास मदत होईल. जेव्हा कोणतेही वाहन कर्षित (टो ) केले जाते, तेव्हा त्या वेळी वाहतूक अंमलदार एमटीपी टो अँप उघडून आणि त्या टो केलेल्या वाहनांची सर्व माहिती फॉर्ममध्ये भरून हेल्पलाईनवर सादर करतात. जेणेकरून कोणीही व्यक्ती हेल्पलाईनवर कॉल करून त्याची माहिती घेऊ शकेल. आम्ही नागरिकांसाठी ‘मुंबई वाहतूक पोलिस अॅप’ देखील तयार केले असुन यामुळे वाहतूकीबाबत खूप महत्त्वाची माहिती मिळून ते त्यांचे कोणतेही काम सोईस्करकरपणे करू शकतात.

     

     

    मल्टीमीडिया केंद्र

    मल्टीमीडिया केंद्र

    मल्टीमीडिया केंद्र

    सोशल नेटवर्किंग चॅनल (जसे की ट्विटर, व्हॉट्स ॲप, इंस्टाग्राम, फेसबुक इ.). ब्लॉग्ज, यूट्यूब, माहितीपूर्ण संकेतस्थळ, वाहतूक पोलिस ॲप इ. सारख्या विविध माहिती तंत्रज्ञान घटकांचा वापर केल्याने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम माध्यम होउन आणि लोकांमध्ये चांगली प्रतिमा तयार करण्यात मदत होते. सर्वसामान्य नागरिकांना संदेश देण्यासाठी रेडिओ, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक या प्रसार माध्यमांचा वापर महत्त्वाची भूमिका बजावण्यसाठी मदत करतो.

     

     

     

    स्मार्ट जीपीएस प्रणाली

    स्मार्ट जीपीएस प्रणाली

    स्मार्ट जीपीएस प्रणाली

    स्मार्ट जीपीएस प्रणालीचा स्मार्ट वायरलेस मैसेजिंगद्वारे संप्रेषण करण्यासाठी वापर केला जातो. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत योग्य कारवाई करण्यासाठी किंवा जवळच्या रायडर वाहनाची माहिती घेण्यासाठी या प्रणाली उपयोग होतो.

     

     

     

     

     

    व्हिएमएस

    व्हिएमएस

    व्हिएमएस

    व्हेरिएबल मैसेजिंग सिस्टीम हे आपत्ती व्यवस्थापन योजनेच्या अंतर्गत व्हिएमएस इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन फलक मुंबई मध्ये स्थापित केले आहेत. यामुळे प्रशासनाला आपत्तीच्या काळात जनतेकरिता महत्वाचे संदेश प्रसारीत करण्यासाठी मदत होते. या प्रणालीद्वारे आपत्तीच्या काळात प्रदर्शित केलेले संदेश हे सूचनात्मक असतात आणि सर्वसामान्य काळातील संदेश हे माहिती स्वरूपात असतात. उदा. वाहतुकीबाबत सूचना, वाहतूक कायद्यांची जागरूकता, पर्यायी मार्ग, शहराशी संबंधित संदेश, विविध कार्यक्रम किंवा उत्सवांचे संदेश, आपत्ती व्यवस्थापन व तयारीचे संदेश, सामाजिक समस्यांवरील सामुदायिक शिक्षणाचे संदेश, इ.

     

     

     

    समूह संदेश प्रणाली

    समूह संदेश प्रणाली

    समूह संदेश प्रणाली

    पोलिस आणि नागरिकांना सुरक्षितेसाठी सतर्कता, चेतावणी आणि माहितीपूर्ण संदेश मिळण्यास मदत होते.

     

     

     

     

     

     

    सार्वजनिक घोषणा प्रणाली

     

     सार्वजनिक घोषणा प्रणाली


    सार्वजनिक घोषणा प्रणाली

    कर्तव्यावरील पोलीस व अधिकारी किंवा अंमलदार हे सार्वजनिक घोषणा प्रणाली (पब्लीक अनाऊंसमेंट सिस्टिम) याचा वापर करून गर्दीचे ठिकाणी, महत्वाचे पादचारी जंक्शन, रेल्वे / बस स्थानक इ. ठिकाणी वाहतूक नियमन करावे, रस्त्यावरील अपघात, पर्यायी मार्ग, बंदोबस्त, आपत्कालीन स्थितीत परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी माहिती, सुरक्षा व सूचनापर संदेश देणे, इ. बाबत वाहन चालक व नागरिकांना मार्गदर्शन व परिस्थितीजन्य संदेश व सूचना देण्यासाठी वापर करतात. या प्रणालीमध्ये मायक्रोफोन, ऍम्प्लिफायर आणि लाऊडस्पीकर यांसह इलेक्ट्रॉनिक ध्वनी प्रवर्धन आणि वितरण प्रणाली याचा वापर केला जातो.

     

     

     

     

    ई चलन

    ई चलन

    ई चलन

    मुंबई वाहतूक पोलिसांची ‘ई चलन’ ही मुंबई शहरातील प्राथमिक वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सुविधा आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांना सुरळीत वाहतूक करण्यासाठी सदर सुविधा समर्पित आहे. नमूद उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वाहतूक अंमलबजावणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. ई चलन हे मोटार वाहन कायदा तसेच वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी जारी केलेले इलेक्ट्रॉनिक चलन (स्पॉट ट्राफीक तिकीट ) प्रणाली आहे. या सेवेमध्ये हाताने वापरायची ई चलन मशीनचा (स्पॉट फायनिंग सिस्टीमचा) समावेश असून याने जागेवरच दंडाची तडजोड रक्कम वसूल केली जावून तत्काळ औपचारिक मुद्रित पावती दिली जाते. भारतातील विविध शहरे उदा . बंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, विजयवाडा इत्यादींनी सुद्धा वाहतूक नियमन आणि अंमलबजावणीसाठी ई चलन ही प्रणाली सुरु केली आहे.