कार्यक्रम
1) रस्ता सुरक्षा सप्ताह-२०२४
दि. ११-१-२०२४ रोजी वाहतूक नियंत्रण शाखा, मुंबई पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह-२०२४ अंतर्गत रस्ता सुरक्षा दल संचलन समारंभ नायगाव पोलीस परेड मैदान, नायगांव, दादर (प) येथे संपन्न झाला. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर यांच्या शुभ हस्ते ‘रस्ता सुरक्षा दल’ संचलन २०२४ मानवंदना व विजेत्यांचा बक्षिस समारंभ पार पडला.
रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त वाहतुकीच्या विविध नियमांचे पालन करणे आणि नागरिकांमध्ये त्याबद्दलची जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबईतील विविध ट्रॅफिक चौकीतील पोलीसांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
2) नियमांचे पालन केल्याबद्दल प्रशंसा
मोटरसायकलस्वार व मागे बसणारा (पिलियन रायडर) या दोघांनी शिरस्त्राण (हेल्मेट) व्यवस्थित घातल्याचे दिसले असता, वाहतूक विभागाकडुन कौतुकाचे प्रतीक म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.