उद्दिष्टे आणि कार्ये
सुरक्षितता आणि संरक्षणासाठी वाहतूक नियमांचे पालन करा…. जीवन मौल्यवान आहे..!
मुंबई शहरामध्ये रहदारीच्या वेळी वाहतूक नियमन करणे जेवढे जिकरीचे काम आहे तेवढेच वर्दळीच्या वेळी वाहन चालविणे. तद्वतच सतर्कतेने वाहन चालविण्याशिवाय पर्याय नाही. ज्या वेळी आपण एक चालक म्हणून एका वाहनाचे नियंत्रण करीत असता, त्या दरम्यान मुंबई वाहतूक पोलीस सुमारे ४.० दशलक्ष वाहनांचा प्रवास सुरळीत व्हावा हे सुनिश्चित करत असतात. एक चालक व मुंबई वाहतूक पोलीस यांच्यामध्ये वाहतूक नियमन व नियंत्रणाचे तत्व सारखे आहे. परंतू वाहतूक पोलिसांच्या कामाचा आवाका प्रचंड प्रमाणात आहे.
मुंबई शहराची विशिष्ट भौगोलीक मर्यादा वाहन संख्येतील लक्षणीय वाढ, वाहनतळांची कमतरता व काही बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे वाहतूक नियमन हि आव्हानात्मक बाब आहे.
समोर अनेक आव्हाने असताना देखील श्री. विवेक फणसळकर (भा.पो.से.), पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई; श्री. देवेन भारती (भा.पो.से.), विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई; श्री. प्रवीण पडवळ (भा.पो.से.), पोलीस सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली सुमारे ३५०० पोलीस अधिकारी व अंमलदार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनांचा व पादचाऱ्यांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित प्राधान्याने होणे सुनिश्चित करतात.
सुरक्षित शिस्तबद्ध प्रवास…… जीवन अनमोल आहे.
तसेच ‘परिवर्तन अपरिहार्य आहे’ या उक्तीप्रमाणे मुंबईतील वाहतूक व वाहन संख्येतील लक्षणीय वाढ, मुलभुत रस्ते सुविधामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे.